Image Not Found

लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधान नको : सुप्रिया सुळे

देश

लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधान पद नसावं, या शिवसेनेच्या मताशी आपण सहमत असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत बोलतांना सांगितलं. कदाचित माझ्या पक्षाला माझी भूमिका मान्य नसेल, पण पंतप्रधानपद लोकपाल कक्षेच्या बाहेर असावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या आधी संसदेत शिवसेना नेते अनंत गंगाराम गीते यांनी पंतप्रधानपद लोकपालाच्या कार्यकक्षेत आणू नये असं म्हटलं होतं.

मीडीयाकडून नेत्यांनर होत असलेल्या टीकेच्या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकारण्यांनी लोकशाही पद्धतीने आपसातील मतभेद संपवून लोकांसमोर आपली प्रतिमा सुधारली पाहिजे.

लोकपाल हा भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं पहिलं पाऊल आहे. संसदेत याबाबतीत सर्व पक्षांनी सहमती दर्शवली पाहिजे असंही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलतांना म्हटलंय.