राज्यात दरवर्षी १० लाखापेक्षा अधिक लोक अपघातात ठार होतात. त्यामुळं रस्ता सुरक्षा धोरण ठरवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं रस्ता सुरक्षा धोरण प्राथमिक रित्या करण्यात आलं. त्यात प्रवासी विमा, गाडीचे चालक, वाहक यांचा विमा यासह आरोग्य, रस्ते, अपघाती क्षेत्रातल्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या सूचना केल्या आहेत. येत्या काळात राज्यात परिवहन, गृह आणि बांधकाम खात्याच्या माध्यमातून धोरण तयार करण्याची मागणी सुळे यांनी केली.
