दौंड : ”राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
”सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील वाद, रुपयाचे अव्यमूलन, कोलमडणारी ग्रामीण अर्थव्यवस्था, सीबीआयअंतर्गत लाच प्रकरणावरून झालेल्या धाडी आणि केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद दुर्दैवी आहेत. अशा विसंवाद आणि वादांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब होत आहे. त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत आहे,” असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.
अभ्यास आणि नियोजनाचा अभाव असलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम योग्य नाही. जलयुक्तचे जे काही काम झाले, त्याचे श्रेय अभिनेता अमिर खान व पाणी फाउंडेशनचे आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार