एमपीसी न्यूज –

रविना टंडन या वास्तवतेपासून कोसो दूर आहेत.गरीब शेतकरी किती कष्ट करतात याची जाणीव एके महिलेला नाही याचे आश्चर्य वाटते. शेतकरी आंदोलन करतात म्हणून त्यांना जेलमध्ये घालावे, ही किती योग्य आहे. सरकारचे लांगुलचालन तरी किती करावे, याचा अतिरेक रविना टंडन यांच्या व्यक्तव्यातून दिसून येतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री रविना टंडन हिच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
दोन दिवसांपुर्वी अभिनेत्री रविना टंडन हिने आंदोलन करणा-या शेतक-यांविषयी “अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.” या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर रविनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. याच आधारे सुप्रिया सुळे यांनी रविनाला चांगलाच फैलावर घेत असे लोक वास्तव्यापासून कोसो दूर असतात, गरीब शेतकरी किती कष्ट करतात. याची जाणीवहा त्यांना नसते असे म्हटले आहे.
दरम्यान, चोहोबाजुने टिका होत असताना रवीनाने आपल्या ‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव करत आपल्या ट्वीटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं आपण म्हंटल्याचं रवीनाने स्पष्ट केलं आहे.