शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही – सुप्रिया सुळे

महाराष्ट्र

एमपीसी न्यूज –

भाजपची सत्ता असतानाही शरद पवार यांच्यावर टीका करावी लागते यातच सरकारचे अपयश दिसून येते. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यावर टीका केली. 

केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविणारे पवार आता मात्र, शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देत आहेत. त्यांना आता अचानक शेतकऱ्यांविषयी कळवळा निर्माण झाला आहे, असे आरोप पाशा पटेल यांनी सोमवारी केले होते. त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले.

http://www.mpcnews.in/latest-news/item/20400-sharad-pawar-does-not-get-publicity-without-criticism-supriya-sule