Image Not Found

सुप्रिया सुळे यांचा दौंड नगरपालिकेवर मोर्चा

दौंड विधानसभा महाराष्ट्र लोकसभा मतदार संघ

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला.

दौंड रेल्वे जंक्शन आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वाहतुकीची समस्या दौंडवासीयांना मोठ्या प्रमाणात सतावत आहे.

त्यासाठी शहराअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे लाईनखालून भुयारीमार्ग मंजूर केला. मागील वर्षी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या मार्गाचं भूमीपूजन केलं.निधीही मंजूर झाला.  पण तरीही नगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यास टाळाटाळ करते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्यासाठी त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलं होतं.