
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी गटातील १६ गावामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या गावभेटी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुळे यांचा दौरा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरु झाला. व रात्री ९ वाजता संपला. अकरा तासामध्ये १६ गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सुळे यांनी विशेष:ता महिलांशी संपर्क साधला. वयश्री योजनेची माहिती मिळाली होती का? अपंगाच्या मेळाव्याची माहिती देण्यात आली होती का? गावामध्ये पाणी येते का? रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत का? याची माहिती घेतली.
एरवी राजकीय कार्य्रकमाला महिलांची हजेरीचे प्रमाण कमी असते. मात्र सुळेच्या दौऱ्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता.या वेळी सुळे यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये मध्ये महिलांचा टक्का वाढला आहे. आज अनेक गावामध्ये महिला कारभारी (सरपंच) असून गावचा कारभार सक्षमपणे सांभाळत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच अनेक गावामध्ये सुळे यांचा महिलांनी सत्कार केल्यामुळे सुळे भारावून गेल्या. पुणे जिल्हातील अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा वर्कर यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ कार्ड तयार करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी देवून महिलांना कामानिमित्त फिरण्यासाठी विशेष सायकलची निर्मिती ही करणार असून इंदापूर तालुक्यातील मुलींसाठी ३५०० सायकली वाटप करणार असल्याचे सांगितले.
आमदार भरणे, सभापती जगदाळे व माने यांचे कौतुक…
इंदापूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान खासदार सुळे यांनी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या कामाचे कौतुक करुन तालुक्याचा विकास होत आहे. नागरिकांना अडचणी असल्यास त्यांनी थेट आमदार भरणे, सभापती जगदाळे, माने व माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
http://www.esakal.com/pune/women-walchandnagar-felicitated-mp-supriya-sule-119315