आम्ही देवाऐवजी संविधानाची शपथ घेतो : सुप्रिया सुळे

पुणे शहर
सकाळ वृत्तसेवा  : सोमवार, 26 नोव्हेंबर 2018
We Swear By The Constitution Rather Than God Said Supriya Sule
पुणे : ”अजित पवार, शरद पवार आणि मी देवाची शपथ न घेता संविधानाची शपथ घेतो”  असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आज (ता.26) पुण्यातील धनकवडी भागात असलेल्या लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन याठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळा त्या बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बारामती लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी संविधान स्तंभ बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत बारामती, सासवड, जेजुरी, मुळशी आणि अन्य ठिकाणी हे स्तंभ उभे करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनकवडी भागातही स्तंभ उभारण्यात आला आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा सत्कारही याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना त्या म्हणाल्या. ”काही महिन्यांपूर्वी काही लोकांनी संविधान जाळण्याचा प्रयत्न केला ज्याचा राष्ट्रवादीने निषेध केला होता. ”संविधान बचाव हे आंदोलन हाती घेणारा राष्ट्रवादी हा पहिला पक्ष आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आले आहेत.एकूण उभारल्या जाणाऱ्या 9 संविधान स्तंभांपैकी 7 स्तंभांचे काम पूर्ण झाले आहे.” अशी माहिती त्यांना यावेळी दिली.

https://www.esakal.com/pune/we-swear-constitution-rather-god-said-supriya-sule-157039