01.48 AM
पुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पदाधिकारी; तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी अधिकाऱ्यांसह मंगळवारी दौंड तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. पडवी येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच सुळे यांच्या समोर वाचला. सरपंच राजेंद्र शितोळे यांनी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली.