संविधान जाळण्याचे महापाप भाजप सरकारच्या काळात झाले- सुप्रिया सुळे

पुणे शहर महाराष्ट्र लोकसभा मतदार संघ

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज पुणे येथील बालेवाडीत गणेश कला, क्रीडा मंडळ येथे संविधान बचाव , देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात एक अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे म्हटले. संविधान जाळण्याचे महापाप याच सरकारच्या काळात झाले. भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यावर साधी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, म्हणूनच संविधान धोक्यात आहे असे आम्हाला वाटते. संविधानाविरोधात कोणीही काहीही बोलले तर आपण ते सहन न करता त्याविरोधात बोलायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुढचे काही महिने अडचणीचे आहे. आपण या संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. हे सरकार उदासीन आहे म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. सणासुदीची वेळ आहे, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा असे काम आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

http://www.dainikprabhat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%aa/