जैन समाजाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय : खा. सुप्रिया सुळे

इंदापूर विधानसभा महाराष्ट्र
प्रशांत चवरे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे येथील जैन स्थानकांमध्ये सुरु असलेल्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, डि.एन. जगताप, शंकरराव गायकवाड, जयदीप जाधव, धनाजी थोरात, जैन संघाचे संघपती अशोक रायसोनी, अध्यक्ष अभय रायसोनी, रवींद्र रायसोनी, विजय बोगावत,संजय रायसोनी उपस्थित होते. यावेळी बोलताना साध्वी सन्मितीजी म्हणाल्या, राजकारण व समाजकारण यांचा उत्तम मिलाफ पवार कुटुंबामध्ये पहावयास मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात येत असलेले मुलींसाठी सायकल वाटप, सर्वसामान्यांच्या आरोग्यांसाठी शिबीर असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले सुत्रसंचालन राहुल गुंदेचा यांनी केले तर आभार संजय रायसोनी यांनी मानले.

https://www.esakal.com/pune/contribution-jain-community-very-important-said-supriya-sule-150224