धनंजय… लोकसभेचा विचार करताय काय ? – सुप्रिया सुळे

महाराष्ट्र
राजेभाऊ मोगल
03.28 PM

औरंगाबाद – धनंजय… तुमचे हिंदीतले अतिशय सुंदर भाषण आज प्रथमच ऐकले, लोकसभेचा विचार करताय का काय ? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवारी (ता.09) चांगलीच गुगली टाकली. मुंडे यांनीही या गुगलीने गोंधळून न जाता स्माईल दिली. 

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलतांना विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या भाषणात हिंदीतील काही वाक्य आणि काही हिंदी शेरचा उल्लेख होता. त्यांच्या नंतर भाषणाला उठलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांच्याकडे पाहत आज तुमचे हिंदीतील भाषण प्रथमच ऐकले, खूप छान हिंदी बोलता, कोणी हिंदी बोलू लागले की तो लोकसभेचा विचार करतो आहे का काय ? असा विचार आमच्या मनात येतो, तुमच्या मनात ही तसा काही विचार नाही ना ? अशी गुगली टाकली. या गुगलीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष मुंडे काय प्रतिक्रिया देतात याकडे गेले, मात्र त्यांनी या गुगलीवर फक्त एक स्माईल देत या गुगलीला सन्मानजनक उत्तर दिले.

तत्पूर्वी, बोलतांना मुंडे यांनी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती व्यक्त केली.

http://www.esakal.com/marathwada/dhananjay-mundhe-are-you-think-about-lok-sabha-says-supriya-sule-148657