‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर ‘मातोश्री’ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’ ‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी […]

Continue Reading
Supriya Sule

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

‘शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?’ असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. मनमाड तालुक्यातील अंदरसुल इथं त्यांची सभा झाली. त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली. कांद्याला भाव नसल्यानं कृष्णा डोंगरे यांनी 5 एकर शेतातला कांदा जाळला होता. नांदगावमध्ये शेतकऱ्याने जाळलेला कांदा मी […]

Continue Reading

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते : सुप्रिया सुळे

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेच्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी ‘एबीपी माझा’शी एक्स्लुझिव्ह बातचीत केली. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी […]

Continue Reading

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

एकीकडे  भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, ‘यालाच पार्टी विथ डिफ्रन्स’ म्हणायचं का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला. युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता हवी आहे, या प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. “आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतो. मी […]

Continue Reading
Supriya Sule

…तर दस नंबरी नागीण स्वभाव दाखवेल : सुप्रिया सुळे

“महिलांच्या नादाला लागू नका, अन्यथा ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असे जळजळीत उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या जळगावमध्ये बोलत होत्या. “भाजप सुडाचे राजकारण करत आहे. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, अशा धमक्या मुख्यमंत्री देत आहेत. मात्र कोणतीही महिला तिच्या गळ्यापर्यंत आल्याशिवाय आवाज काढत नाही. कोणी जर तिला […]

Continue Reading

कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा….

कोपर्डी बलात्कार प्रकरणात जर येत्या दोन दिवसात चार्जशीट दाखल झालं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आज त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. कोपर्डीप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र आज कोपर्डी घटनेला 84 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही. […]

Continue Reading

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली. बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान  होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ नाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Continue Reading

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे

दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर […]

Continue Reading
Image Not Found

सुप्रिया सुळे यांचा दौंड नगरपालिकेवर मोर्चा

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. दौंड रेल्वे जंक्शन आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वाहतुकीची समस्या दौंडवासीयांना मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यासाठी शहराअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे लाईनखालून भुयारीमार्ग मंजूर केला. […]

Continue Reading
Image Not Found

दादाबद्दल अनेक गैरसमज, तो अतिशय प्रेमळ, हळवा : सुप्रिया सुळे

अजितदादाबद्दल अनेक गैरसमज झाले आहेत. असे गैरसमज पसरवले जात आहेत. दादा कमी बोलणारा आहे, अतिशय प्रेमळ, हळवा आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’च्या  ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. “अजितदादांवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. पवार फॅक्टर 50 वर्षे महाराष्ट्रात टिकून आहे, त्यामुळे त्यांच्यावर […]

Continue Reading