मुख्यमंत्र्यांचा `पायगुण’ जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे

महाराष्ट्र

योगेश महाजन, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, 24 तास वीज मिळते काय ? जळगावमध्ये सकाळी सात ते दहा व सायंकाळी सात ते दहा असे रोज सहा तास भारनियमन होत आहे. या सरकारचे नियोजन नसून, जनता वेठीस धरली जात आहे. शेतकरी बांधव दुष्काळात होरपळले आहेत. मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही, अशीही टीका खासदार सुळे यांनी यावेळी केली.

राम कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांची चुप्पी 
दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम हे महाराष्ट्रातील मुलींबद्दल असभ्य भाषेचा वापर करतात हे भारतीय संस्कृतीसाठी लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांनी आमदार कदम यांना चाप द्यायला हवा होता. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर काही तरी कारवाई होणे अपेक्षित होते. हेच जर “राष्ट्रवादी’च्या एखाद्या आमदाराने केले असते तर त्याला जनतेसमोर नेऊन जाहीर माफी मागायला लावले असते. लोकप्रतिनिधींनी असे बोलणे योग्य नाही आणि यावर गृहमंत्र्यांनी साधलेली चुप्पी याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

http://www.sarkarnama.in/amalner-supriya-sule-devendra-fadanvis-29575