ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करु नका : सुप्रिया सुळे

महाराष्ट्र

संजय काटे 

मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

श्रीगोंदा (नगर) : “जे पक्ष सोडून गेले. ज्यांनी साक्षात पाडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करण्याचीही गरज नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी टोलेबाजी केली.

सुप्रियाताई आज श्रीगोंदा दौऱ्यावर होत्या. युवा संवाद साधताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता त्यांनी टोलेबाजी केली. सुळे म्हणाल्या, जे पक्ष सोडून गेले. ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करण्याचीही गरज नाही. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार राहूल जगताप यांच्यावर लक्ष आहे. त्यांचे कामही चांगले आहे. त्यांना मी आदर्श मानते. सहकारात कसे काम करायचे, हे राहूलकडून मलाही शिकायचे आहे. यावेळी आमदार राहूल जगताप, डॉ. प्रणोती जगताप, राजेंद्र फाळके, मंजूषा गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, संदीप वर्पे, वैशाली नागवडे, सचिन जगताप, दादा दरेकर, डॉ. सुवर्णा होले, मंगेश सुर्यवंशी, रवि बायकर आदी उपस्थित होते.

http://www.sarkarnama.in/supriya-sule-criticise-babanrao-pachpute-29308