एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची दुरावस्था सरकारला दाखविण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरु केली होती. मात्र वर्षानंतरही रस्त्यांची अवस्था जैसे थे च असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा सरकार विरोधात सेल्फी विथ पॉटहोल्स मोहीम उघडली आहे.
