Maharashtra Times | Updated:

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘हाताची घडी तोंडावर बोट’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बदनामी केली जात असल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन केली. ‘या फेसबुक पेजवरून अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली जात आहे; तसेच वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अथवा मी कधीही, कुठेही न बोललेली विधाने तयार करून, मजकूर बदलून, फोटो मार्फिंग करून ती विधाने आमचीच आहेत, असे भासविले जात आहे. त्याद्वारे जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे,’ असे सुळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.