
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजच्या माध्यमातून शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत ही तक्रार करण्यात आली आहे.
‘हाताची घडी, तोंडवर बोट’च्या माध्यमातून आमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. आक्षेपार्ह मजकूर डिलीट व्हावा, तसेच हे पेज कायमचं बंद केलं जावं, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस