खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान

देश

यावेळी आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती, ‘प्राईमटाईम फाउंडेशन’चे संस्थापक के. श्रीनिवासन आदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना तो प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ व अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता.

संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कार स्वीकारताना सुळे म्हणाल्या, ‘माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे. हा पुरस्कार मला जनतेलाच समर्पित करताना आनंद होत आहे.’