सुप्रिया सुळे उद्या चौंडीत; अहिल्यादेवींना अभिवादन करणार!

महाराष्ट्र
सरकारनामा ब्युरो : बुधवार, 30 मे 2018
सुप्रिया सुळे उद्या चौंडीत
नगर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उद्या (ता. 31 ) जामखेड तालुक्‍यातील चौंडी येथे सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याने सुळे भाजपविरोधात काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाची तयारी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. सुळे सकाळी चौंडी येथे होळकर यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करतील. नंतर जामखेड येथे हत्या झालेल्या योगेश व राकेश राळेभात यांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन करणार आहेत.

http://www.sarkarnama.in/supriya-sule-chondi-tour-ahilyadevi-jayanti-24375